युवकाच्या खूनप्रकरणी दोन नगरसेवकांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मानवत (परभणी)- नागनाथ लेंगुळे याचे अपहरण करुन झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या आईच्या तक्रारीवरुन दोन नगरसेवकांसह अन्य दोघांविरूद्ध पोलिसांनी गुरुवारी (ता. 25) रात्री अकरा वाजता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मानवत (परभणी)- नागनाथ लेंगुळे याचे अपहरण करुन झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या आईच्या तक्रारीवरुन दोन नगरसेवकांसह अन्य दोघांविरूद्ध पोलिसांनी गुरुवारी (ता. 25) रात्री अकरा वाजता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चतुराबाई लेंगुळे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे, की आपला मुलगा नागनाथ लेंगुळे हा पोरवाल जिनिंगमध्ये पाच ते सहा महिन्यांपासून मजुरीचे काम करीत होता. नागनाथविरूद्ध जिनिंगचे मालक प्रकाश पोरवाल यांनी कापसात वजन कमी करुन विश्वासघात केल्याचा तक्रार अर्ज दिल्यामुळे आपल्यावर कारवाई होईल या भितीने नागनाथ परभणी येथील खंडोबा बाजार परिसरात राहत असलेली बहीण आशामती जगडेकडे राहण्यासाठी गेला होता. 15 मे रोजी प्रकाश पोरवाल, दीपक बारहाते, व्यंकट शिंदे, अमरदीप रोडे या चौघांनी घरात घुसून नागनाथला खंडोबा बाजार परिसरात नेऊन मारहाण केली. मारहाण करुन परस्पर परभणी आणि औरंगाबादच्या दवाखान्यात दाखल केले. दवाखान्यात जाऊन भेट घेतली असता वरील नमुद चार जणांनी मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या संदर्भाने विशेष पोलिस महानिरीक्षकांन निवेदन देण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी (ता. 25) सकाळी नऊ वाजता नागनाथचा मृत्यू झाला. दरम्यान, आमच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास मलाही जिवे मारण्याची धमकी दिली. चतुरा मदन लेंगुळे यांच्या तक्रारीवरुन काल रात्री मानवतचे नगरसेवक दीपक बारहाते आणि परभणीचे नगरसेवक अमरदीप रोडे यांच्यासह प्रकाश पोरवाल, व्यंकट शिंदे यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.

तणाव निवळला
नागनाथ लेंगुळेच्या मृत्यूची बातमी शहरात धडकताच नातेवाईकांसह समाजबांधवानी गुरुवारी (ता. 25) शहर बंद पुकारले होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे शहरात दाखल झाले होते. रात्री 11 वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी शुक्रवारी (ता. 26) शहरात तळ ठोकुन होती.

मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीविषयी आणखी वाचा:

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

06.57 PM

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

06.09 PM

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

05.30 PM