धनंजय मुंडेंमध्येच बीडचा विकास करण्याची धमक - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

परळी वैजनाथ - राज्यातील जनता या सरकारमुळे त्रस्त झाली आहे. बीडचे पालकमंत्रिपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची धमक फक्त धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. २०) केले.

बीड जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या दिवसाची शेवटची सभा येथे झाली. श्री. पवार म्हणाले, की बीडसह राज्याचे प्रश्‍न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मांडत असतात. हल्लाबोल यात्रा सुरू करताना आंदोलनाला इतका जबरदस्त पाठिंबा मिळेल, याची कल्पना नव्हती. आगामी विधानसभा निवडणुकीत परळीसह सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आणाव्यात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, की बारामतीनंतर कोणता मतदारसंघ चर्चेत असेल तर तो परळी आहे. जनतेने २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांना विधानसभेवर पाठवून जिल्ह्यासह राज्याचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यापासून आम्हाला अधिवेशनात दररोज सरकारविरोधात त्यांची बॅटिंग पाहायला मिळते. विधानपरिषदेत धनंजय मुंडे आणि विधानसभेत अजितदादा भाषणाला उभे राहिले, की सरकारला घाम फुटतो, असे भाजपचेच लोक सांगतात. 

धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल आंदोलनाला प्रतिसाद दिल्याबद्दल परळीकरांचे आभार मानले. पक्षाच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या कामाची स्तुती करीत परळी विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादीचा उमेदवार असतील असे सांगतानाच २०१९ मध्ये परळीसह जिल्ह्यातील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देण्याचे आवाहन केले.

सभेपूर्वी चार ते पाच किलोमीटर अंतरावरून कार्यकर्त्यांनी मोटारसायकल फेरी काढली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, चित्रा वाघ यांनी भाजप-शिवसेना सरकारवर हल्लाबोल केला.

सभेला माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेंद्र जगताप, गोविंद देशमुख आदींसह नेतेमंडळी उपस्थित होती.

Web Title: parli vaijnath marathwada news dhananjay munde threatens to beed develop