प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

बीड - बिंदू नामावलीबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून आक्षेप मागवून या आक्षेपांनुसार असलेल्या त्रुटी दूर करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी (ता. 20) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

बीड - बिंदू नामावलीबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून आक्षेप मागवून या आक्षेपांनुसार असलेल्या त्रुटी दूर करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सोमवारी (ता. 20) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या शिक्षकांचा व जिल्ह्यातील मूळ शिक्षकांचा निवडीचा प्रवर्ग बदलला असल्याने 1995 व 2016 ची बिंदू नामावली आक्षेप घेण्याकरिता गटशिक्षण अधिकारी कार्यालय स्तरावर उपलब्ध करून द्यावी, बिंदू नामावलीतील आक्षेप दूर करावेत, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना राज्यस्तरीय रोस्टर पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये, शिक्षकांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्यात यावे, 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वरिष्ठांशी पत्रव्यवहार करावा; तसेच भविष्य निर्वाह निधी हिशेबाच्या व "डीसीपीएस'च्या जमा रकमेच्या पावत्या त्वरित देण्यात याव्यात, प्रशासकीय बदलीसंदर्भातील शासन निर्णयातील त्रुटी दूर कराव्यात, प्रशासकीय बदल्या न करता विनंती व आपसातच बदल्या करण्यात याव्यात, बदलीसाठी सोपे व अवघड क्षेत्र ठरविताना संघटना प्रतिनिधींना विश्वासात घ्यावे व शासनमान्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे बदलीतून सूट देण्यात यावी, धारूर, वडवणी व शिरूर या ठिकाणी गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला अद्याप कार्यालयीन पद मान्य नसून त्याबाबत लवकरच निर्णय व्हावा, गटशिक्षण अधिकारी व पंचायत समिती; तसेच तहसील कार्यालयातील सर्व प्रतिनियुक्‍त्या रद्द करण्यात याव्यात; तसेच त्यांच्याकडील पदभार काढून पदभार देताना सेवाज्येष्ठता किंवा समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच पदभार देण्यात यावा, नियमबाह्य पदोन्नत्या त्वरित रद्द करण्यात याव्यात, बृहत आराखड्यातील मंजूर केलेल्या शाळेच्या बांधकामासाठी योग्य ती कार्यवाही करावी, 2016 अखेरपर्यंतच्या शिक्षकांना कायम करावे, 20 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयात जमा झालेले सर्व वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव 20 मार्चपर्यंत निकाली काढावेत, निलंबित शिक्षकांना चौकशीच्या अथवा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पुन्हा सेवेत सामावून घ्यावे, आंतरजिल्हा बदली प्रस्ताव निकाली काढून त्यांना समुपदेशनाद्वारे ऑनलाइन पद्धतीने पदस्थापना एकत्रितपणे देण्यात यावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खेडकर व जिल्हा सरचिटणीस दिलीप खाडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सखाराम थोरवे, महारुद्र कातकडे, सुनील म्हेत्रे, शेख वजीर, शेख अमजद, प्रवीण मेहरकर, बी. के. सिरसाट, अशोक धोंडे, सुनील डोईफोडे, जयराम बांगर, हिरामण कांगरे, अर्जुन मुंडे, मधुकर सानप, शिवहार भताने, शिवाजी टिके, संजय दराडे, लहू पवार यांच्यासह प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते. 

Web Title: Pending orders for primary teachers hold protest