"तो' खड्डा दुरुस्तीचे काम अखेर सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

लातूर - येथील शिवाजी चौकातील जुन्या रेल्वे लाइनच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तसेच याच ठिकाणी सळयाही उघड्या पडल्याने अपघाताची भीती निर्माण झाली होती. या संदर्भात "सकाळ'ने काही दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. आता महापालिकेच्या वतीने या खड्ड्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम तरी दर्जेदार होणार काय याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे. 

काही महिन्यांपूर्वी शिवाजी चौक ते उद्योग भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आमदार फंडातून नालीचे काम करण्यात आले होते. यात जुन्या रेल्वे लाइनचा रस्त्यावरून सर्व्हिस रस्त्यावर येण्याकरिता नालीवर स्लॅब टाकून रस्ता तयार करण्यात आला होता; पण निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शिवाजी चौकात वाहतुकीची एकदम गर्दी होऊ नये म्हणून उद्योग भवनकडून शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक या रस्त्याने वळवली आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात आहेत; पण गेल्या काही दिवसांपासून नालीवरील स्लॅबला मोठा खड्डा पडला होता. तसेच या स्लॅबच्या सळया उघड्या पडल्या होत्या. या संदर्भात "सकाळ'ने ता. 24 जानेवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महापालिकेने त्याची दखल घेत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. 

Web Title: pit Repair work started