सराफाला लुटणाराच्या मुसक्‍या आवळल्या 

crime
crime

औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यानात मैत्रिणीसोबत फिरायला आलेल्या सराफ व्यापाऱ्याला भरदिवसा लुबाडणाऱ्या दोघांना क्रांती चौक पोलिसांनी रविवारी (ता. 27) बेड्या ठोकल्या. संशयितांनी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून मारहाणही केली होती. 

शेख रफीक शेख ताज मोहम्मद (वय 20), फेरोजखान बाबूपठाण (वय 20, दोघे रा. कासंबरी दर्गा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. 

पोपट राजाराम ढगे (रा. धावणी मोहल्ला) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत सिद्धार्थ उद्यानात पर्यटनासाठी आले होते. पर्यटनानंतर ते एका ठिकाणी गवतावर बसले. ही संधी साधून शेख रफीक व फेरोज त्यांच्याजवळ आले. त्यांनी दोघांना दरडावून "येथे काय करता आहात, कशाला बसला आहात?' असे म्हणाले. यावर उत्तर देण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोपट ढगे यांना शेख रफिक व फेरोजने बेदम मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच दुसऱ्याने पोपट ढगे यांना चाकू दाखवत त्यांचे 22 हजार रुपये, कागदपत्रे, ओळखपत्र हिसकावले होते. सिद्धार्थ उद्यानासारख्या सुरक्षितस्थळी हा प्रकार घडल्याने ही बाब क्रांती चौक पोलिसांनी गंभीररीत्या घेतली. पोपट ढगे यांची तक्रार नोंदवून घेत याप्रकरणात पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी याप्रकरणातील संशयितांची पडताळणी सुरू केली. जबरी चोऱ्या करणाऱ्यांचे रेकार्ड मिळविल्यानंतर कासंबरी दर्गा भागात राहणाऱ्या दोघांनी लुबाडल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी संशयित शेख रफिक व फेरोजला ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी आपण गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शेख अकमल, सहायक फौजदार संजय बनकर, जमादार गोपाल सोनवणे, सतीश जाधव, विनोद नितनवरे यांनी केली. 

आणखी गुन्हे उघडकीस येणार 
शेख रफीक पेंटिंग काम करीत असून फेरोज मातीकाम करतो. त्यांच्याकडून आणखी जबरी चोऱ्यांचे गुन्हे उघड होण्याची शक्‍यता असून त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com