latur-police
latur-police

चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न 

लातूर - जिल्हा पोलिस दलाच्या दृष्टीने सरते वर्ष अनेक घटनांनी महत्त्वाचे राहिले. पानगाव येथे ग्रामस्थांनी काढलेली पोलिसांची धिंड, शहरात मागासवर्गीयांच्या मोर्चात झालेली दगडफेक, पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेला एलआयसी पॉलिसीचा घोटाळा, वेगवेगळ्या खुनाच्या घटनांचा यात समावेश आहे. या सर्वांवर मात करीत गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी समाजात चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा होत असलेला प्रयत्न महत्त्वाचा ठरत आहे. खून, हाणामाऱ्या, चोऱ्यांपुरतेच पोलिस मर्यादित नाहीत, तर तेही समाजाचा एक घटक आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न होत आहे. यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घरफोड्या, दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात मात्र पोलिसांना अपयश येत आहे. 

पानगाव येथे शिवजयंतीच्या दिवशी झेंड्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिस चौकीवर हल्ला करीत दोन पोलिसांची धिंड काढली. देशभर हे प्रकरण गाजले. त्यानंतर जवखेड्याच्या प्रकरणात मागासवर्गीय संघटनांनी काढलेल्या मोर्चात दगडफेकीमुळे पुन्हा एकदा लातूर चर्चेत आले. किती लोक मोर्चात येतील याचा अंदाज पोलिसांना आला नव्हता; पण त्यानंतर मराठा, मागासवर्गीय व मुस्लिम समाजाचे लाखोंचे मोर्चे व्यवस्थित हाताळण्यात मात्र पोलिसांना यश आले. उदगीर येथील संगीता पेन्सलवार खूनप्रकरण अतिशय संवेदनशीलपणे पोलिसांनी हाताळत उघडकीस आणले. येथील अमृत मुक्ता या मुलाचा वडिलांनीच केलेला खून, निलंगा येथे अनैतिक संबंधातून झालेला एक खून, चाकूर येथे अक्कानवरू यांचा खून अशी खूनप्रकरणे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. यात स्थानिक गुन्हे शाखेचे कार्य महत्त्वाचे राहिले आहे. 

गेली तीन चार वर्षे दडवून ठेवण्यात आलेला पोलिस अधीक्षक कार्यालयातील एलआयसी घोटाळा मात्र उघडकीस आला. अनेकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतानासुद्धा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्यामुळे मटका गुरुजीला अटक करावी लागली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com