औरंगाबादचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल आयसीसीयूत दाखल

औरंगाबादचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल आयसीसीयूत दाखल

औरंगाबाद : न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे माजी खासदार व महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांना मंगळवारी सकाळी छातीत दुखत असल्याने घाटीत मेडिसिन विभागाच्या आयसीसीयुत दाखल करण्यात आले आहे. 

शहरातील दंगल प्रकरणातील गांधीनगर भागातील दोघा तरुणांना तात्काळ जामिनावर सोडण्याच्या मागणीसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात झालेल्या वादात गुन्हा नोंद झाला. त्यात शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना सोमवारी दुपारी तीन च्या सुमारास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. खारकर यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

त्यानंतर जैस्वाल यांनी दाखल केलेला नियमित जामिन अर्जही न्यायालयाने फेटाळला होता.

मंगळवारी सकाळी त्यांना छातीत दुखायला लागल्याने त्यांना घाटीच्या बाह्यरुग्ण विभागात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी अपघात विभागात हलवले.

तपासण्यानंतर त्यांना मेडिसिन विभागाच्या आयसीसीयु मध्ये भरती करण्यात आले असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com