नशिब बलवत्तर म्हणून वाचला ‘प्रकाश‘

Prakash Kharat
Prakash Kharat

आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वेमधे बुटपॉलिश करून उदरनिर्वाह करणाऱ्या प्रकाश खरात या तरुणाला मात्र रेल्वेच्या खिडकीचा हात सुटल्यानंतर सारे संपले असे वाटले. मात्र पाठीवर बुटपॉलिशचे साहित्य व कपड्याच्या पिशवीवर पडल्याने केवळ तोंडाला व हाताला खरचटले एवढीच दुखापत झाली. केवळ नशिब बलवत्तर असल्याने प्रकाश मोठया अपघातातून बचावला

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील प्रकाश भिमराव खरात (वय२६) हा वाडी भागात राहतो. रेल्वेत प्रवाशांचे बुटपॉलीश करण्यास सुरवात केली. अनेक वेळा गावी येता येत नसल्याने त्याने दररोज लागणारे साहित्य एका बॅगमधे ठेवले होते. दोन दिवसापुर्वी त्याने लातुर जवळील नांदखेडा स्टेशनवरून धावत रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने उडी मारली पण यावेळी दरवाज्याच्या बाजूचा दांडा त्याच्या हाती येण्या ऐवजी खिडकीचे गज हाती लागले. रेल्वे धावत असतांना त्याने रेल्वेच्या दरवाजा जवळ येण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वेचा वेग वाढल्याने प्रकाश घाबरला. आता सारे संपले असे दिसू लागले अन त्याने हात सोडला अन गिट्टीच्या बाजूला कोसळला.

विशेष म्हणजे हा प्रकार होत असतांना रेल्वेतील प्रवाशांनी मात्र चैन न ओढता छायाचित्रीकरण करण्यास सुरुवात केली. वाचण्याची कुठलिही संधी नसल्याने घाबरलेल्या प्रकाशने हात सोडले. काही वेळानंतर परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता प्रकाशच्या केवळ तोंडाला व हाताला दुखापत झाल्याचे दिसून आले.   नांदेखेडा येथील रुग्णालयात उपचार घेऊन प्रकाश नुकताच आखाडा बाळापूर येथे पोहोचला आहे. नशिब बलवत्तर असल्याने पूनर्जन्म झाल्याची प्रतिक्रीया त्याने व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com