नांदेड: पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस कारावास

Prison to a accused for attacking policemen in Nanded
Prison to a accused for attacking policemen in Nanded

मुक्रमाबाद - मुखेड तालुक्यातील मनू ( तांडा) येथील एका आरोपीला आजामीनपाञ वारंट बजावण्यासाठी गेलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यावर संबंधित आरोपीने दगड फेक करून गंभीरपणे जखमी केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. यातील आरोपीला मंगळवार दि ९ ला मुखेड प्रथम श्रेणी न्यायालयाने दोषी ठरवत अकरा महीने पाच दिवस कारावास व दोन हजार शंभर रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश नम्रता बिरादार यांनी ठोठावली आहे. 

मुक्रमाबाद पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या मनू (तांडा) येथील मारोती किसन चव्हाण, वय ४५ वर्षे या आरोपीस  पोलिस कर्मचारी बि. एल. चिट्टलवाड व कातपुरे हे दि ९ अॉगस्ट २०१६ ला मुखेड न्यायालयाचे आजामीनपात्र वारंट बजावण्यासाठी गेले असता त्यांना अश्लिल भाषेत शिवागाळ करत त्यांच्यावर दगडफेक करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. त्याप्रकरणी चिट्टलवाड, यांच्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी विरोधात मुखेड न्यायालयात सबळ पुराव्यासह दोषारोप सादर केले होते. त्यानुसार न्यायालयाने सदरील पुराव्याची पडताळणी करून प्रथम श्रेणी न्यायाधीश नम्रता बिरादार, यांनी मारोती किसन चव्हाण याला दोषी ठरवत अकरा महीने पाच दिवसाचा कारावास व दोन हजार शंभर रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅन्ड, चवरे यांनी बाजू मांडली.


      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com