परळीपर्यंत रेल्वेबाबत रेल्वेमंत्री अनुकूल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

खासदार मुंडे या रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीच्या एकमेव महिला सदस्य आहेत. त्यांनी या विषयावर सतत पाठपुरावा केला होता. गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजी त्यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन हा प्रश्न पुन्हा त्यांच्यासमोर मांडला.

परळी वैजनाथ - मुंबई-लातूर एक्‍स्प्रेस रेल्वेचा परळीपर्यंत विस्तार करण्यास सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला अनुकूलता दर्शविली असल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले.

सोमवारी (ता. आठ) या विषयावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. खासदार मुंडे या रेल्वे मंत्रालय सल्लागार समितीच्या एकमेव महिला सदस्य आहेत. त्यांनी या विषयावर सतत पाठपुरावा केला होता. गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजी त्यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन हा प्रश्न पुन्हा त्यांच्यासमोर मांडला.

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील प्रभू यांची पंधरा दिवसांपूर्वी भेट घेऊन बीडच्या रेल्वेबरोबरच लातूर एक्‍स्प्रेसच्या परळीपर्यंत विस्ताराचा मुद्दा मांडला होता. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. लातूर एक्‍स्प्रेस बिदरपर्यंत वाढविल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयात सोमवारी (ता. आठ) बैठक होणार आहे.

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017