खासगी रुग्णालयात धनादेश देण्याचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - पाचशे आणि हजार रुपयांची नोट व्यवहारातून रद्द करण्यात आल्यानंतर, ज्यांच्याकडे सुट्या पैशांची अडचण आहे अशा रुग्णांकडून धनादेश घ्यावेत, अशा खासगी रुग्णालयांना शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे रुग्ण धनादेशाचा वापर करीत आहेत. मात्र, तपासणीपूर्वीच काही ठिकाणी "तुमच्याकडे सुटे पैसे आहेत ना,' अशा स्वरूपाची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली.

रुग्णांकडून धनादेश घ्यावेत, असे शासनाने एक परिपत्रकच काढले. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तसेच तातडीने शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांनी विविध रुग्णालय प्रशासनांस धनादेश दिले. शहरातील काही बड्या रुग्णालयांनीदेखील अडवणूक केल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, याची खातरजमा करण्यास चौकशी केली असता, आम्ही रुग्णांना सहकार्य करीत आहोत, अशी उत्तरे मिळाली.
एका शस्त्रक्रियेसाठी डॉक्‍टरांची वेळ घेण्यात आली होती. त्यांनी सर्व तपासण्या करून रुग्णाचे रिपोर्ट जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तयारीही करण्यात आली. मात्र, ऐनवेळी डॉक्‍टरांनी विचारले, की तुमच्याकडे सुटे पैसे आहेत ना? कारण आम्ही पाचशे आणि हजारांच्या नोटा घेणे बंद केले आहे. त्यावर धनादेश देतो म्हटल्यानंतर शस्त्रक्रिया पार पडली.

शहरात येणाऱ्या तसेच शहराबाहेर जाणाऱ्या गाड्यांची पोलिस सध्या तपासणी करीत आहेत. घरातील मंडळीसाठी मोटारसायकलवरून अंथरूण, पांघरूण घेऊन येत असताना पोलिसांनी माझ्याकडून दोन्ही पिशव्यांची झडती घेतली. तसेच यात पैसे तर नाहीत ना, असा प्रश्‍न उपस्थित केला. तपासणी केल्यानंतर सोडून दिले.
- राहुल सूर्यवंशी, विटा-औराळा (ता. कन्नड)

Web Title: private hospital checks