खासगीकरणासाठी वीज गळती वाढविण्याला वरिष्ठांचा पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

औरंगाबाद - महावितरणची मराठवाड्यात कृषीपंप आणि घरगुती वीजजोडणीची मोठी थकबाकी आहे. औरंगाबाद वगळता लातूर आणि नांदेड परिमंडळाची वीजहानी वीस टक्‍क्‍यांहून अधिक आहे. हे प्रमाण कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मराठवाड्यात येऊ दिले जात नाही. आल्यास त्यांची तत्काळ इतरत्र बदली करण्यात येते. 

औरंगाबाद - महावितरणची मराठवाड्यात कृषीपंप आणि घरगुती वीजजोडणीची मोठी थकबाकी आहे. औरंगाबाद वगळता लातूर आणि नांदेड परिमंडळाची वीजहानी वीस टक्‍क्‍यांहून अधिक आहे. हे प्रमाण कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मराठवाड्यात येऊ दिले जात नाही. आल्यास त्यांची तत्काळ इतरत्र बदली करण्यात येते. 

दरम्यान, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी औरंगाबाद परिमंडळाची वीजहानी कमी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. या उपाययोजनांना यश मिळणेही सुरू झाले असताना त्यांना पाठबळ देण्याचे सोडून त्यांची बदली करण्याचा घाट घालण्यात आला. औरंगाबाद परिमंडळाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची छुपी चर्चाही परिमंडळात रंगली आहे. 

खासगी कंपनी जीटीएल गेल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवीत शहराच्या वीजपुरवठ्याची जबाबदारी योग्यरीत्या पेलली. या कामाला मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी जोरदार पाठबळ दिले. त्यांनी धडाकेबाज कारवाई करीत परिमंडळातील थकबाकी वसूल केली. एवढे नाही तर थकबाकी भरण्याचे दोन वर्षांपासून केवळ आश्‍वासने देणाऱ्या महापालिकेच्या पथदिवे व पाणीपुरवठ्याची वीज तोडून त्यांनाही पैसे भरण्यास भाग पाडले. 

कामातील तत्परतेने मुख्य अभियंता गणेशकर हे केवळ नऊ महिन्यांतच वायरमन ते अभियंता या सर्वांत आवडीचे अधिकारी बनले होते. औरंगाबाद परिमंडळाची वीजगळती 18 टक्‍के आहे. ही गळती कमी करण्यासाठी योग्य नियोजनाचीही आखणी करण्यात आली होती. मात्र, बदलीचा घाट मांडून त्यांच्या या आखणीवर पाणी फेरण्याचे काम वरिष्ठांनी केल्याचे बोलले जात आहे. औरंगाबाद परिमंडळाची वीजहानी वाढवून महावितरणकडील हे काम खासगीकरणाच्या माध्यमातून कंपनीकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांची नांदेडला तडकाफडकी बदली केल्याचे बोलले जात आहे. 

वरिष्ठांना खुपतेय गणेशकरांची कारवाई 
मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी औरंगाबाद परिमंडळात सुरू केलेल्या थकबाकी वसुली, गळती कमी करण्याच्या मोहिमेमुळे त्यांची कामाची महावितरणच्या सर्व कार्यालयांत चर्चा होत आहे. धडाकेबाज कामामुळे त्यांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्‍यता आहे. ही बाब वरिष्ठ पातळीवरील काही अधिकाऱ्यांना खुपत आहे. या कुरघोडीच्या राजकारणातूनच ही बदली करण्यात आली असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

परिमंडळनिहाय वीज गळती 
औरंगाबाद - 18.39 टक्‍के 
लातूर - 22.46 टक्‍के 
नांदेड - 23.49 टक्‍के 

मराठवाडा

नांदेड : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता.१९) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले. तसेच...

07.00 PM

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावरिल श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे श्रावणमास...

03.51 PM

पूर्णा : तालुक्यात दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर वरूनराजाचे दमदार आगमन झाले आहे. अतीवृष्टीने तालुक्यातील धानोरा काळे येथील...

03.24 PM