संघ कार्यालयावर फेकली निळ अन्‌ निषेधाची पत्रके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रवक्‍ते मनमोहन वैद्य यांच्या आरक्षण बंद करावे या वक्तव्याचा निषेध म्हणून येथील संघाच्या कार्यालयासमोर आरपीआय (खरात) गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आज निळ व निषेधांची पत्रके फेकली. त्यानंतर पोलिसांनी संघ कार्यालयाला सुरक्षा पुरविली आहे.

दोन दिवसांपूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये संघाचे प्रवक्‍ते मनमोहन वैद्य यांनी आरक्षण बंद करण्यासंबंधी वक्तव्य केले होते. याविरोधात औरंगाबादेतील संघ कार्यालयासमोर आरपीआय (खरात) गटाच्या तीन महिला कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. त्यांनी घोषणाबाजी करून निळ आणि पत्रके फेकली. त्यानंतर त्या निघून गेल्या, अशी माहिती जिल्हाध्यक्ष फकिरचंद अवचरमल यांनी दिली. हा प्रकार समजताच पोलिस घटनास्थळी पोचले; परंतु तोपर्यंत कार्यालयासमोरील पत्रके उचलून पडलेल्या निळीवर पाणी टाकत घटना लपविण्याचा प्रयत्न झाला.

दरम्यान, या घटनेनंतर औरंगाबादेतील संघ कार्यालयाशी संपर्क साधला असता, निळ व पत्रके फेकल्याचा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

मराठवाडा

उस्मानाबाद, लातूर - उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  खामसवाडी (ता....

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

‘संस्थान गणपती’तर्फे साकारला जाणार सजीव देखावा, विविध कार्यक्रमांचे आयोजन  औरंगाबाद - शहरातील मानाचा म्हणून परिचित...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

शंभर कोटींच्या ३१ रस्त्यांना अखेर शासनाची प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविली नियंत्रणाची जबाबदारी  औरंगाबाद -...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017