प्रवासी वाहतुकीचा चक्काजाम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - केंद्र शासनाने परिवहन विभागाच्या विविध शुल्कांमध्ये भरमसाट वाढ केली. याच्या निषेधार्थ रिक्षा, टेंपो, काळी-पिवळी चालकांनी मंगळवारी (ता. 31) चक्काजाम आंदोलन केले. मराठवाडा टॅक्‍सी, मेटॅडोर ऍण्ड जीप ओनर्स असोसिएशनतर्फे आमखास मैदानात वाहने उभी करण्यात आली. 

औरंगाबाद - केंद्र शासनाने परिवहन विभागाच्या विविध शुल्कांमध्ये भरमसाट वाढ केली. याच्या निषेधार्थ रिक्षा, टेंपो, काळी-पिवळी चालकांनी मंगळवारी (ता. 31) चक्काजाम आंदोलन केले. मराठवाडा टॅक्‍सी, मेटॅडोर ऍण्ड जीप ओनर्स असोसिएशनतर्फे आमखास मैदानात वाहने उभी करण्यात आली. 

परिवहन विभागाने केलेल्या भरमसाट शुल्कवाढीच्या निषेधार्थ शहरात आंदोलन करण्यात आले. मराठवाडा टॅक्‍सी, मेटॅडोर ऍण्ड जीप ओनर्स असोसिएशनने आमखास मैदानात वाहने उभी केली. रिक्षा, काळी-पिवळी, टेंपो आणि ट्रक्‍स उभ्या करण्यात आल्या. अध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर दिवसभर ठिय्या देऊन शासनाच्या धोरणावर कडाडून हल्ला चढविण्यात आला. आंदोलनाच्या अनुषंगाने रिक्षा, टॅक्‍सी, काळी-पिवळी, टेंपो आदी वाहने आमखास मैदानात उभी करण्यात आले. या वेळी मनमोहनसिंग ओबेरॉय, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे निसार अहेमदखान यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी भाषण करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. या आंदोलनात रिक्षाचालक कृती महासंघाचे शेख इस्माईल, शेख वजीर, महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे अध्यक्ष मिलिंद मगरे, रत्नाकर काथार, रोशन ऑटो रिक्षा युनियनचे मोहम्मद बशीर, नाहेद फारुकी, मोहम्मद फारुक, राजीव गांधी ऑटो रिक्षा युनियनचे एस. के. खलील, पॅंथर पॉवरचे गजानन वानखेडे, सुधाकर इंगळे, भारतीय रिक्षाचालक संघाचे गणेश भोसले, परिवर्तन रिक्षा संघटनेचे शेख लतिफ, शेख अकबर, शेख कादर, वाय. एफ. खान रिक्षा युनियनचे इम्रान पठाण, राजेश रावळ, जनता रिक्षा युनियनचे अब्दुल रशीदखान, भ्रष्टाचारविरोधी चालक-मालक संघटनेचे शेख नजीर अहेमद, ऑल मराठवाडा रिक्षा युनियनचे मोहम्मद मोसीन, मोहम्मद नसीम तसेच रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे निसार अहेमद खान, रमाकांत जोशी, जावेद मणियार आदी संघटना व प्रतिनिधी तसेच रिक्षाचालक सहभागी झाले होते. 

या आहेत प्रमुख मागण्या 
- परिवहन विभागाच्या शुल्कांमध्ये केलेली वाढ मागे घ्यावी. 
- परवान्यातील फेरफार रोखण्यासाठी आधार लिंकिंग करावे. 
- वाढवलेला दंड मागे घ्यावा. 
- परिवहन कार्यालयात लोकसंख्येच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.