लोहमार्ग पोलिसांना सतर्कतेचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नांदेड - कानपूर आणि भोपाळ रेल्वे अपघाताच्या घटना लक्षात घेता महाराष्ट्रातील लोहमार्गावर दहशतवादी घातपात घडवू शकतात, अशी शक्‍यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. रेल्वे विभागाने या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहून सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. संभाव्य घातपाताची शक्‍यता लक्षात घेता राज्यात ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दक्षिण-मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागात मोठ्या प्रमाणात रेल्वे धावतात. देशातील प्रमुख शहरांना हा विभाग जोडला आहे. परभणी जिल्ह्यातही अलीकडे रेल्वे रुळात बिघाड घडवून आणला होता; परंतु रेल्वेचालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला होता. या प्रकरणी लोहमार्ग नांदेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. कानपूर आणि भोपाळमध्ये घातपात घडविल्यानंतर दहशतवादी महाराष्ट्रात असाच प्रकार घडविण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. भिकाऱ्याच्या किंवा विक्रेत्याच्या वेशात येऊन दहशतवादी अशा कारवाया करू शकतात, अशी शक्‍यताही वर्तविली जात आहे. 

या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशन आणि रेल्वे रुळांवर पेट्रोलिंग वाढविण्याची गरज असून संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवाव,÷िअशी विनंती रेल्वे विभागाने आपल्या पत्रातून केली आहे. अनधिकृत विक्रेते, भिकारी आणि भटक्‍या मुलांना रेल्वेच्या जागांमधून बाहेर काढावे, अशी विनंतीही रेल्वेने केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि आसपासच्या परिसरात रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवल्याचे प्रकार उघड झाले होते. त्यानंतर आता गुप्तचर विभागानेच घातपाताची शक्‍यता वर्तविल्यामुळे पोलिस यंत्रणा आणि रेल्वे विभाग सतर्क झाले आहेत. या पत्रानंतर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून प्रवाशांच्या सामानाची व संशयित व्यक्तींची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

Web Title: Railway police vigilance in order