लातूर जिल्ह्यात सात मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस

लातूर जिल्ह्यात सात मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस

लातूर - गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने लातूरकरांना थोडासा दिलासा मिळाला असतानाच रविवारी (ता. ९) रात्री पुन्हा पावसाने झोडपले. यात शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील साकोळ मंडळात रात्रीतून २०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. याच तालुक्‍यातील शिरूर अनंतपाळ १६५, हिसामाबाद मंडळात १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.  जिल्ह्यात सात महसूल मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्याला पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय, अशी परिस्थिती असताना सप्टेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले. सहा लाख हेक्‍टर क्षेत्रावरील खरीप पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. गेल्या पाच- सहा दिवसांत पावसाने उघडीप दिली होती. मात्र शनिवारी व रविवारी रात्री मात्र पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात तर पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. लातूर १६, कासारखेडा ४०, गातेगाव १, तांदुळजा ००, मुरूड ६, बाभळगाव ४०,  हरंगुळ ७, चिंचोली ००, औसा १४, लामजना २१, किल्लारी १५, मातोळा ८, भादा ७, किनिथोट ५१, बेलकुंड २०,  रेणापूर २०, पोहरेगाव १२, कारेपूर ५, पानगाव ११, उदगीर १६, मोघा ३२, हेर २६,  देवर्जन ११९, वाढवणा १५, नळगीर ७, नागलगाव २०, अहमदपूर १३, किनगाव ११, खंडाळी १६, शिरूर ताजबंद २२, हडोळती ९, अंधोरी १५, चाकूर ११, वडवळ १२, नळेगाव २२, झरी ९, शेळगाव १५, जळकोट ३०, घोणसी १५, निलंगा ४०, अंबुलगा ९१, कासारशिरसी २८, मदनसुरी २२, औराद ३५, कासारबालकुंदा २५, निटूर १३४, पानचिंचोली ५३, देवणी ९८, वलांडी १४५, बोरोळ १०३, शिरूर अनंतापाळ १६५, हिसामाबाद १०५, साकोळ  मंडळात २०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सरासरी १११० मिलिमीटर पाऊस
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०२.१३ मिलिमीटर असून आतापर्यंत १११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी वार्षिक सरासरीच्या पावसाच्या टक्केवारीची आहे. लातूर १००८.२५ (१४१.२१), औसा ९७९.०८ (१२०.२९), रेणापूर ११६६.९० (१६३.४३), अहमदपूर ११०६.५८ (१३२.७८४), चाकूर १२१४.५० (१४५.४८), उदगीर १०९६.५५ (१२४.४९), जळकोट १०५२ (१३७.१४), निलंगा ११६५.१४ (१६३.५५), देवणी १०७३.९६ (११८.९६), शिरूर अनंतपाळ १२४५.९७ (१७४.९०).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com