मराठवाड्यात पावसाने पुन्हा दाणादाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

लातूर - मराठवाड्याला पावसाने पुन्हा एकदा झाेडपले आहे. लातूर जिल्ह्यातील साकाेळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथे २०५ मिलिमीटर पावसाची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर अनेक गावांमध्ये १०० मिलिमीटरच्या वर पाऊस झाला आहे. याशिवाय नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांसह विदर्भातही जोरदार वृष्टी झाली असून, कापणीला अालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांना रविवारी सकाळपर्यंत (ता.९) मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे दाणादाण उडाली. कापणी केलेले सोयाबीन पीक पाण्यामुळे भिजून मोठे नुकसान झाले आहे. पाऊस पाठ सोडायला तयार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूर्णा तालुक्यात ओढे-नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक पाच ते सहा तास ठप्प झाली. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. हिंगोली मंडळामध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. 

संततधारेने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
रत्नागिरीः गेले तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज गडगडाटासह दिवसभर संततधार धरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येण्याची वेळ आली आहे. भातपीक आडवे पडूनही काहीच करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आश्‍विन महिन्यात आषाढ सरी कोसळत असल्याचा अनुभव सध्या जिल्हावासीय घेत आहेत.