भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा कळंब तहसीलवर मोर्चा

kalamb
kalamb

कळंब : भारतीय जनता पक्षाच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ बॅंकेने (परळी, जि. बीड) अत्यंत कमी किमतीत हावरगाव (ता. कळंब) येथील शंभु महादेव साखर कारखाना दिलीप नाडे यांच्या डीडीएन शुगर फॅक्ट्रीला (मुरुड, जि. लातूर) विकला आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पक्षाचे सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. 18) कळंबच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात शेतकऱ्यांसह भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. वैद्यनाथ बॅंक मुर्दाबादच्या घोषणेने कळंबचा तहसील परिसर दणाणून गेला होता.

हावरगाव येथील शंभु महादेव साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नऊ कोटी 70 लाख रुपये गेल्या दीड वर्षांपासून थकले आहेत. शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिल प्रश्नी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याशिवाय कोणालाच पुळका आला नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी थकीत ऊस बिलचा प्रश्न उचलून धरल्यानंतर साखर आयुक्तांनी शंभु महादेव साखर कारखान्याच्या मालकीच्या सर्व प्रॉपर्टीची विक्री करून शेतकर्यांचे पैसे द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे याना दिले होते. त्यानंतर साखर कारखान्याची प्रॉपर्टी विक्री करण्याची प्रक्रिया करण्यात आली. मात्र,वैद्यनाथ बॅंकेने आक्षेप घेत कारखान्याच्या प्रॉपर्टी विक्रीला न्यायालयात धाव घेऊन ब्रेक दिला.

वैद्यनाथ बॅंकेने या कारखान्याचा लिलाव काढून दिलीप नाडे यांच्या डीडीएन शुगर फॅक्ट्री (मुरुड) या कारखान्याला 54 कोटी रुपयांना विक्री केला,ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे चुकते केल्याशिवाय कारखान्यात पाऊल ठेवायचे नाही, वैद्यनाथ बॅंकने अत्यंत कमी किमतीत कारखाना विकला असा आरोप करीत सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी साडेअकराला मोर्चाला सुरवात करण्यात आली होती. तहसील कार्यलयावर मोर्चा धडकला. वैद्यनाथ बॅंक मुर्दाबादच्या घोषणा भाजप, शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी दिल्या. यानंतर भाजपचे सुरेश पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे, तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, भाजपचे साहेबराव बोंदर, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांनी वैद्यनाथ बॅंकेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भाषणातून टीकेची झोड उठविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com