शौचालय न बांधणाऱ्यांचे रेशन बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

उस्मानाबाद : शौचालय नसलेल्या 1113 कुटुंबांचं रेशन बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर ग्रामपंचायतीनं घेतलाय. असा निर्णय घेणारी आणि या निर्णयाची अंमलबजावणी करणारी तेर ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

ग्रामस्थांनी शौचालय बांधावे म्हणून आतापर्यंत सरकारच्या वतीने अनेकदा आवाहन करण्यात आलं आहे. ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायतींमार्फत शौचालयांबाबत प्रबोधन केलं जातं. मात्र तेर ग्रामपंचायतीच्या हद्दील काही लोक वारंवार सूचना देऊनही शौचालय बांधत नव्हते.

त्यामुळे अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी ग्रामपंचायतीने शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या याद्या प्रत्येक रेशन वितरकाकडे सुपूर्द केल्या आहेत. तसच त्यांचं रेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.