परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यास 50 हजाराची लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

अभिमन्यु बोधवड यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती

परभणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज(17 एप्रिल) रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सापळा रचून 50 हजाराची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांना अटक केली.

अभिमन्यु बोधवड यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पोलिस उपअधिक्षक नारायण बेंबडे यांच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश व्यवहार कॅशलेस होत असल्याने या प्रकरणातही 50 हजाराची लाच धनादेशाद्वारे स्विकारण्याचा फंडा वापरण्यात आला.

Web Title: RDC of Parbhani arrested by anti corruption