मुस्लिम आरक्षणासाठी शुक्रवारी विराट मूकमोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

औरंगाबाद - मुस्लिम समाजाला पंधरा टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लिम आरक्षण मूकमोर्चा कृती समितीतर्फे शुक्रवारी (ता.6) दुपारी तीन वाजता आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात अडीच लाख बांधव सहभागी होतील. मोर्चाच्या तयारीसाठी सहा हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाली असल्याची माहिती मंगळवारी (ता. तीन) संयोजन समितीतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात हस्तक्षेप थांबवा, वक्‍फ बोर्डाच्या मालमत्ता सुरक्षित करून शासकीय कार्यालयाकडील जागा बोर्डाच्या ताब्यात द्याव्यात, कॉमन सिव्हिल कोडला विरोध, ज्या युवकांना दहशतवादाच्या संशयावरून अटक करण्यात आली, मात्र ते निर्दोष सुटले, त्यांना नुकसान भरपाई द्यावी, या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे सर्व अहवालातून सूचित करण्यात आले आहे. न्यायालयाने सुद्धा मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व पुरावे, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग, सच्चर आयोग, महेमुद उर्र रहेमान समिती, काकासाहेब कालेकर आयोग, वि. पी. मंडल आयोग, श्री. गोपालसिंग आयोगमधून मुस्लिम समाजाची स्थिती समोर आलेली आहे. त्यानंतरही आरक्षण देण्यात येत नाहीत. काढण्यात येणाऱ्या मोर्चास 150 संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. मुस्लिम समाजाला आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती उंचाविण्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. मोर्चाच्या तयारीसाठी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी बैठका झाल्या आहेत. पोलिस प्रशासनाने सुद्धा मोर्चासाठी मदत केली आहे. मोर्चाच्या दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, छावणी इदगाह, रोशनगेट सूतगिरणी मैदान, रोजाबाग इदगाह येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चाच्या दिवशी तीन मुली आणि एका मुलाचे आरक्षणाविषयी भाषण होईल इतर कुणीही स्टेजवर राहणार नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.