पडकी शाळा ‘आयएसओ’ मिळविते तेव्हा...

yashogatha-aurangabad
yashogatha-aurangabad

भिंत कोसळलेली, आवारात जनावरांचा गोठा आणि सुविधा कशाला म्हणतात याची जाणीवही न झालेल्या शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळेल, असे स्वप्नातही कुणाला वाटले नव्हते; पण औरंगाबादच्या कुशीत वसलेल्या सातारा या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेने ते शक्‍य करून दाखविले. आमूलाग्र बदल घडवीत ‘आयएसओ’ मिळविणारी देशातील ही पहिली शाळा ठरली...! त्यानंतर या शाळेने मागे वळून पाहिलेले नाही. गुणवत्तेत वाढच होत आहे.

मुंजूश्री राजगुरू या मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा शाळेची अवस्था दयनीय होती. पडक्‍या भिंतींमुळे केवळ नावालाच इमारत होती. त्यामुळे सुविधा असण्याचा काही संबंधच नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांचीही पाठच होती. हे चित्र पालटण्यासाठी ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. शाळेच्या विकासाचा नियोजनबद्ध आराखडा तयार झाला. शंभर टक्के उपस्थितीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. या साऱ्या प्रयत्नांना ग्रामस्थांची साथ आणि यश मिळू लागले. वर्षभरातच शाळेने ‘साने गुरुजी स्वच्छ- सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर ही शाळा उपक्रमशीलच बनली अन्‌ विविध पुरस्कारांची मानकरीही. एप्रिल २०११ मध्ये शाळेला ‘आयएसओ’ नामांकन मिळाले. केंद्र सरकारच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार अभियानात ही शाळा जिल्ह्यात पहिली आली. लोकसहभागातून शाळेला २००७-०८ पासून १३ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. शिक्षण अधिकार अभियानाला राष्ट्रीय स्तरावर गती देण्यासाठी केंद्रीय संसाधन विकास मंत्रायलातर्फे राज्याच्या शिक्षणाचे नुकतेच मूल्यांकन केले गेले. २०१० पासून शिक्षण अधिकाराच्या अधिन राहून या शाळेची रोल मॉडेल म्हणून निवड झाली.

आता शाळेत काय?
 बैठकीसाठी लोकसहभागातून शेडनेट. 
 पहिली ते सातवीपर्यंत ५७१ विद्यार्थी, १७ शिक्षक कार्यरत. 
 वाचनालयात साडेसहा हजार पुस्तके. 
 संगणक कक्ष, वायफाय, सीसीटीव्ही, ई-लायब्ररी, एलईडी प्रोजेक्‍टर, साउंड सिस्टीम, वॉटर फिल्टर, इन्व्हर्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर दिवा, सांडपाणी व्यवस्था, खतनिर्मिती आदी.
 २०११-१२ पासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com