सव्वाशे किलोमीटर रस्त्यासाठी ७१ कोटींचा निधी

Road
Road

बीड - सध्याच्या जिल्ह्यांतर्गत गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे भाग्य उजळणार असून १२० किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजुरीला सोमवारी (ता. नऊ) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात येणाऱ्या रस्ता कामासाठी ६६ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी असून पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी चार कोटी ७९ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. 

ग्रामविकास विभागाने विविध तीन शासनादेशाने या रस्ता कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासनाचे उपसचिव र. आ. नागरगोजे यांनी हे शासनादेश निर्गमित केले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील गावांतर्गत रस्ते पुढील काळात मजबूत होणार आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ही कामे केली जाणार असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने स्थानिक पातळीवरील पुढील तांत्रिक प्रक्रियांना आता वेग येणार आहे.  

कार्यकर्त्यांच्याही हाताला कामे!
दरम्यान, आमदारांनी सुचविलेल्या कामांसाठी ग्रामविकास विभागाने नुकताच ३६ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सिमेंट रस्ते, नाल्या, संरक्षक भिंत, स्मशानभूमी, सौर पथदिवे, आर ओ. प्लॅंट आदी गावांतर्गत कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहेत. तीन लाखांच्या पुढील कामे ई टेंडरींगद्वारे होत असल्याने दोन लाख ९९ हजार, तीन लाख अशा रकमेची कामे मंजूर करण्यात आली आहेत. नाराज असलेल्या कार्यकर्त्यांच्या हाताला कामे भेटावीत असाच या रकमेमागचा हेतू आहे. यामध्ये आर. ओ. प्लॅंट ही कामे पाच लाख रुपयांची असून इतर सर्व कामे दोन लाख ९९ हजार व तीन लाख रुपयांची आहेत. मंजूर यादीत एकूण ९१४ कामांचा यामध्ये समावेश आहे.

तालुका निहाय रस्ता कामे
 अंबाजोगाई - वरपेवस्ती, हंगेवाडी, पासोडी तांडा, शिवाचा तांडा, महेंद्री तांडा, हरणखोरी तांडा, कृष्णा नगर, जिगानाईक तांडा, कोलदरी तांडा, भावठाणा, मंगईवाडा रस्ता, टोंगेवस्ती रस्ता, वाघळवाडी, जोगाईवाडी, खिडवा तांडा, चनई तांडा, दगडू तांडा, पोळेवाडी, खापरटोन ते भतानवाडी, तांदूळवाडी रस्ता, मुरंबी तांडा, चौरेवाडी, कांदेवाडी, दरडवाडी, 

 बीड - सानपवाडी, सोनपेटवाडी, जैताळवाडी, येळंबघाट ते चादर वस्ती, कळसंबर ते भंडारवाडी - कारेगव्हाण, कळसंबर, पिंपरनाई ते बांगरवाडी रस्ता, 

 केज - उंदरी ते पवारवाडी.

 आष्टी - हिवरा ते कोरडेवस्ती, गोखेल लमाणतांडा रस्ता, बरडेवस्ती रस्ता, हरेवाडी, 

 पाटोदा - घुलेवाडी रस्ता. 

 परळी - बेलंबा, खोडवा ते सावरगावतांडा ते मोरकरवाडी, कन्हेरगाव ते देवडा रस्ता, जांभुळदरा तांडा, जळीतांडा, श्रीकृष्ण तांडा, घाटशिळ तांडा, तलवारीचा तांडा.

 वडवणी - रुईपिंपळा, कान्होबाचीवाडी, केंडपिंपरी, ठाकूरवस्ती ते तांबेवस्ती ते तोष्णीवालवस्ती, तांदळ्याचीवाडी रस्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com