धारुरच्या माजी नगराध्यक्षांच्या घरी दरोडा

dharur
dharur

किल्लेधारुर (बीड) : येथील माजी नगराध्यक्षा सविता नामदेव शिनगारे यांच्या घरी दरोडा टाकुन मारहाण करत तीन लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवार सायंकाळी घडली. आरोपींच्या अटकेसाठी बाजारपेठ काही काळ बंद होती. 

चंद्रसेन चौरे, सुग्रीव कराड, रमेश घुले, विकास सांगळे व संभाजी वायभसे व अन्य काही मंडळी सोमवारी सायंकाळी माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांच्या घरात घुसली. कपाटाच्या चाव्या मागत शिवीगाळ करीत उजव्या हाताच्या पोटरी आणी डाव्या बाजुस मारहाण केली. कपाटातील 25 हजार रुपये रोख दहा तोळ्याचे सोन्याचे दागीने असा तीन लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी शाहरातुन फेरी काढून बाजारपेठही बंद ठेवण्यात आली. दुपार नंतर शहरातील व्यवसाय हळुळू पुर्ववत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com