नांदेडमध्ये खंजरचा धाक दाखवून एकाला लुटले 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 29 मे 2018

घाटावरून जाणारे सहा ट्रक किरण तुडमे, सदानंद कुडके, डिस्कु, अनिल बोटलवाड, राम नागुलवार, राहूल सावडेल आणि अन्य तीन जणांनी अडविले. यावेळी प्रविण जेठेवाड यांना त्यांनी खंजरचा धाक दाखविला.

नांदेड - वाळू ठेकेदारास खंजरचा धाक दाखवून २२ हजार जबरी चोरी केली. एवढेच नाही तर दररोज दोन वाळू ट्रक भरून देण्याची मागणी करणाऱ्या नऊ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुंडलवाडी ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नागणी पुलाखाली हरनाळी गावाजवळ माचनुर वाळू घाट आहे. या घाटावरून कंत्राटदार प्रविण जेठेवाड हे माचनुर घाटावर सोमवारी (ता. २८) दुपारी गेले होते. त्यांचे या घाटावरून वाळूचे ट्रक चालतात. परंतु त्यांचे घाटावरून जाणारे सहा ट्रक किरण तुडमे, सदानंद कुडके, डिस्कु, अनिल बोटलवाड, राम नागुलवार, राहूल सावडेल आणि अन्य तीन जणांनी अडविले. यावेळी प्रविण जेठेवाड यांना त्यांनी खंजरचा धाक दाखविला. जबर दुखापत करण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळील २२ हजार रुपये जबरीने काढून घेतले. तसेच या घाटावरून विनाशुल्क दोन ट्रक वाळू दररोज भरून देण्याची मागणी केली. प्रविण जेठेवाड यांच्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात वरील सर्व आरोपींविरूद्ध जबरी चोरी व खंडणीचा गुन्हा दाखल जाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. कागणे हे करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: robbery in nanded

टॅग्स