जालन्यात भरदिवसा दीड लाखांची लूट

 उमेश वाघमारे
गुरुवार, 24 मे 2018

दोन दुचाकीस्वरांनी त्यांना औद्योगिक वसाहत येथील गजश्री कंपनी जवळ गुरुवारी (ता. 24) दुपारी अडवले व त्यांच्या हतातील दीड लाख रूपयांची रोखड असलेली बँग चाकुचा धाक दाखवुन हिसकावून पसार झाले.

जालना - गीताई स्टील कंपनीच्या रोखपालाला रास्त्यात अडवुन दोन अज्ञात दुचाकीस्वरांनी भरदिवसा दीड लाखांची  लुट केली. हा प्रकार गुरुवारी (ता.24) दुपारी जालना औद्योगिक वसाहत येथे घडला आहे.

भाग्यलक्ष्मी स्टील कंपनीतून दीड लाख रूपये घेऊन गीताई स्टील कंपनीचे रोखपाल सनी चिंलखा(रा. संभाजीनगर, जालना) हे कंपनीतील सहकारी ओम मसुरे (रा. काद्राबाद) यांच्यासह दुचकीवरुन जात होते. यावेळी त्यांच्यावर पळत ठेऊन अज्ञात दोन दुचाकीस्वरांनी त्यांना औद्योगिक वसाहत येथील गजश्री कंपनी जवळ गुरुवारी (ता. 24) दुपारी अडवले व त्यांच्या हतातील दीड लाख रूपयांची रोखड असलेली बँग चाकुचा धाक दाखवुन हिसकावून पसार झाले. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी दोन ते तीन संशियतांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: robbery of one and half lakh in Jalna

टॅग्स