संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

लातूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व अखिल भारतीय शारीरिक शिक्षणचे माजी प्रमुख  सुरेशराव केतकर (वय 84) यांचे येथील विवेकानंद रुग्णालयात आज (शनिवारी) उपचारादरम्यान निधन  झाले.

गेल्या साडेचार वर्षांपासून त्यांच्यावर येथे उपचार  सुरू होते. 60 वर्षे त्यांनी प्रचारक म्हणून काम केले. सांगली जिल्हय़ातून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. अखिल भारतीय स्तरावर त्यांनी सहकार्यवाह म्हणूनही काम केले होते. हे काम करीत असताना संस्कार भारती, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले.