शिक्षणाधिकारी जगतापला तीन दिवस पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

उस्मानाबाद - कर्मचारी महिलेचा छळ केल्याप्रकरणी वादग्रस्त शिक्षणाधिकारी (प्रा.) सचिन जगताप याला पोलिसांनी बुधवारी (ता. 23) न्यायासमोर उभे केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

उस्मानाबाद - कर्मचारी महिलेचा छळ केल्याप्रकरणी वादग्रस्त शिक्षणाधिकारी (प्रा.) सचिन जगताप याला पोलिसांनी बुधवारी (ता. 23) न्यायासमोर उभे केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी जगताप याच्या विरोधात 16 एप्रिलला आनंदनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून जगताप 37 दिवस फरारी होता. दरम्यानच्या काळात त्याने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालय, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केले. ते फेटाळले गेले. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली होती.

पोलिसांना तो गुंगारा देत होता. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता. अखेर मंगळवारी (ता. 22) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तो पोलिसांना शरण आला. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात हजर झाला. रात्री त्याला अटक करण्यात आली. आज दुपारी तीनच्या सुमारास त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या गराड्यात असलेल्या जगतापने चेहरा झाकून घेतला होता.

Web Title: sachin jagtap police custody crime