"एमपीएससी'त बीडचा सागर केदार राज्यात पहिला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

बीड - नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालात वन परिक्षेत्रीय अधिकारी (आरएफओ वर्ग-दोन) परीक्षेत जिल्ह्यातील सागर केदार हा एनटी "ड' प्रवर्गातून राज्यात पहिला आला. या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

वारणी (ता. शिरूर) येथील मूळ रहिवासी असलेला सागर हा विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ वर्ग-दोन) या परीक्षेत पहिला आला आहे. सागरचे प्राथमिक शिक्षण बीड, जालना, औरंगाबाद येथे झाले असून, त्याचे वडील दादासाहेब केदार हे बीड पोलिस दलात कार्यरत आहेत.