‘सकाळ फुल टू स्मार्ट’मुळे विद्यार्थ्यांना लागणार ज्ञानाची गोडी

Full-to-smart
Full-to-smart

औरंगाबाद - स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाकडे लक्ष द्यायला हवे. अभ्यासाबरोबरच भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ’ने दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण करणारा असल्याचे मत गोदावरी पब्लिक स्कूलचे उपमुख्याध्यापक दिलीप सूर्यवंशी यांनी व्यक्‍त केले.

‘सकाळ’मधून गुरुवारपासून (ता. २८) विद्यार्थीमित्रांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनासाठी ‘फुल टू स्मार्ट’ हे स्वतंत्र पान विद्यार्थ्यांच्या भेटीला आले आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन गुरुवारी गोदावरी पब्लिक स्कूल येथे करण्यात आले. यावेळी श्री. सूर्यवंशी बोलत होते. ते म्हणाले, की ‘सकाळ’ने शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याचे सातत्याने काम केले आहे. विद्यार्थ्यांना चांगले वाचायला मिळावे, यासाठी स्वतंत्र सदर सुरू आहे. यामागे उद्याची पिढी ज्ञानसंपन्न व्हावी, असाच हेतू आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत खूप वाचन करावे, मोठे व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.  
‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. आजकाल डिजिटलायझेशनच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, वेगवेगळ्या करिअरच्या वाटा त्यांना समजल्या पाहिजेत, त्यांना जगात काय घडामोडी होत आहेत याविषयी माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतला आहे. लहानपणापासून लागलेली वाचनाची गोडीच उद्या यशाच्या शिखरावर निश्‍चितच घेऊन जाणार असल्याचे श्री. वरकड यांनी नमूद केले.

उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, दिनेश शेट्टी यांनीही विद्यार्थ्यांशी बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्या शुभांगी काळे, पर्यवेक्षिका वैशाली सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन धर्मराज शिंदे यांनी केले. पी. जी. राजपूत यांनी आभार मानले.

बक्षिसांचा मोठा खजिना 
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूशखबर! माहितीचा आणि त्याचबरोबर बक्षिसांचा मोठा खजिना तुमच्यासाठी पुन्हा खुला होत आहे. सातत्याने नवनवीन माहिती देणारा ‘सकाळ’ तुमच्यासाठी माहिती, मनोरंजनाचा खजिना असलेले ‘फुल टू स्मार्ट’ हे पान व बक्षिसे मिळवून देणारी स्पर्धा घेऊन येत आहे. विविध विषयांवरील माहिती वेगवेगळ्या सदरांतून वाचायला मिळेल. अवांतर वाचनासोबत यात प्रश्नावली असून, विद्यार्थ्यांना यातून सव्वा कोटी रुपयांची ५५ हजारांपेक्षा जास्त बक्षिसेही दिली जाणार आहेत. भाग घेणाऱ्या प्रत्येकाला हमखास बक्षीस तर मिळणारच, याशिवाय इतरही बक्षिसे आहेतच; तसेच या पानात दर रविवारी ‘पालकत्व’ या विषयातील तज्ज्ञ खास पालकांसाठी लिहिणार आहेत. तर मग तयार राहा ‘स्मार्ट’ व्हायला! 

शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण
गोदावरी पब्लिक स्कूलच्या हरितसेनेतर्फे विद्यार्थ्यांच्या मदतीने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये गणेश संतोष बोर्डे, गौरव रमेश दाभाडे, प्रेमल विजय साळवे, सुहास शशिकांत हिवराळे, गोपाल सतीश गोटूरवार, सोफियान शेख जावेद, सुमित बद्रीनाथ दाभाडे, केतन अनिल मगरे, सिद्धेश्‍वर ज्ञानेश्‍वर गायकवाड, तुषार ईश्‍वर दांडगे यांचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com