पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना पोस्टाने पाठविले सॅनिटरी नॅपकिन्स

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

महिलांच्या आरोग्यांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटी करप्रणालीतून वगळले नसल्याने याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे शुक्रवार (ता.16) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना पोस्टाने सॅनिटरी नॅपकिन्स पाठवून निषेध करण्यात आला. ही मोहिम फुलंब्री येथे राबविण्यात आली. 

औरंगाबाद- महिलांच्या आरोग्यांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन्स जीएसटी करप्रणालीतून वगळले नसल्याने याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे शुक्रवार (ता.16) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना पोस्टाने सॅनिटरी नॅपकिन्स पाठवून निषेध करण्यात आला. ही मोहिम फुलंब्री येथे राबविण्यात आली. 

सॅनिटरी नॅपकिन्स वरील जीएसटी रद्द व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे चर्चगेट येथे स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली होती. महिलांच्या आरोग्याबाबत सरकार असंवेदनशिल असल्याचा आरोप करत सॅनिटरी नॅपकिन्स पाठवून आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. अनुपमा पाथ्रीकर, भाग्यश्री राजपुत, संगिता भालेराव, राधाबाई पवार, लता क्षिरसागर, संगिता पाडाळकर, सुलोचना रघु, रेहाना शहा यांची उपस्थिती होती.