हलाखीतील शिकलकऱ्यांना मिळणार सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

किल्लेधारूर - "शिकलकऱ्यांची 15 कुटुंबे भोगताहेत मरणयातना' ही बातमी सोमवारी (ता. 27) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच येथील तहसीलदार राजाभाऊ कदम व नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी तातडीने दखल घेत शिकलकऱ्यांच्या वस्तीत प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कुटुंबाच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले. 

तहसील कार्यालयापासून जवळच असलेल्या दूरसंचार कार्यालयाच्या बाजूस शिकलकऱ्यांची वस्ती आहे. या वस्तीतील नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याबाबत "सकाळ'ने लक्ष वेधल्यानंतर तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सोमवारीच वस्तीस भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

या वेळी त्यांनी जीतकौर बादलसिंग गोके, कमलकौर आदलसिंग गोके, छायाकौर सुरिंदरसिंह गोके, सागरसिंग बादलसिंह गोके, ठाकूरसिंग ग्यानसिंग गोके, सतनामसिंग गोके, धरमसिंग आदलसिंग गोके यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. संभाजीनगर वस्तीत सार्वजनिक विंधन विहीर आणि गणपती मंदिरासमोरील विंधन विहीर दुरुस्त करून पुरेसा पाणीपुरवठा करावा, महिला आणि लहान मुलांचे कुपोषण होऊ नये यासाठी स्वतंत्र सर्वेक्षण करून अगंणवाडी सुरू करावी, बेरोजगार युवकांना काम देण्यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेतील जॉबकार्ड द्यावे, दारिद्य्ररेषेतील कार्ड देऊन पुरेसे धान्य देण्याची प्रक्रिया सुरू करावी, आधार कार्ड, मतदान यादीत नावे नोंदवावी, वस्तीतील कुटुंबांना घरकुल मिळावे यासाठी त्यांची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करावी इत्यादी सूचना तहसीलदारांनी गटविकास अधिकारी मीनाक्षी कांबळे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पुरवठा विभाग, निवडणूक विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. वस्तीतील जे प्रश्‍न मार्गी लागत नसतील त्या सदंर्भात वस्तीतील प्रमुखांनी ती बाब निदर्शनाला आणून दिल्यास योग्य कार्यवाही करण्याचे आश्‍वासनही या वेळी तहसीलदारांनी दिले.

Web Title: sakal news impact