दुबार पेरणीच्या भीतीने युवकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

सेलू - तालुक्‍यातील चिकलठाणा (खुर्द) येथील योगेश बाळासाहेब थोंबाळ (वय 20, रा. चिकलठाणा, ता. सेलू) या युवकाने दुबार पेरणीचे संकट व बॅंकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून गुरुवारी (ता. 13) शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली.

घटनेचे सविस्तर वृत्त असे, योगेश थोंबाळ याने शेतात पेरलेले बियाणे पावसाअभावी वाया गेले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट व बॅंकांच्या कर्जफेडीच्या विवंचनेतून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश शेतातून घरी परतला नाही म्हणून घरातील मंडळींनी योगेशचा शोध घेण्यास सुरवात केली असता त्यांना रात्री त्याचा मृतदेह आढळला.