सेलू तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

सेलू - कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी सीताराम ज्ञानदेव सोळंके (वय 50) यांचा परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.

सेलू - कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी सीताराम ज्ञानदेव सोळंके (वय 50) यांचा परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.

सीताराम सोळंके यांची अडीच एकर शेती आहे. खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या सततच्या पावसाने पिके पिवळी पडली. बॅंकेचे कर्ज कसे फेडावे, मुलीचे लग्न कसे करावे, या विवंचनेतून त्यांनी सोमवारी (ता. 25) विष प्राशन केले. ग्रामस्थांनी त्यांना परभणी शासकीय रुग्णालयात दाखल केले. आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.