शरद पवार यांना रविवारी डी.लिट. प्रदान करणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ येत्या रविवारी (ता. 26) होणार आहे. या समारंभात माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डी.लिट. ही सन्माननीय मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलपती, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची या वेळी उपस्थिती राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ रविवारी सकाळी विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत. डी.लिट. ही सन्माननीय मानद पदवी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने यापूर्वीच शरद पवार यांना देण्याचे जाहीर केले आहे. शरद पवार यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी आणि इतर क्षेत्रांमध्ये बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची व्याप्ती खूप मोठी असून, महाराष्ट्रातील आणि देशातील जनमानसावर त्यांच्या कार्याचा ठसा उमटलेला आहे. 

मराठवाडा

औरंगाबाद : हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 18) बंजारा समाजातर्फे क्रांती चौक...

02.30 PM

फुलंब्री (औरंगाबाद) : शासनाने तात्काळ पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी औरंगाबाद-जळगाव या राज्य महामार्गावर...

02.12 PM

सर्वजण आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील रहीवासी नांदेड : नांदेड-हैदराबाद महामार्गावर मोटारीने ट्रकला समोरून जोरदार धडक दिली...

01.57 PM