शेंद्रा-बिडकीन जोडणीसाठी ‘ग्रीनफिल्ड’चाच पर्याय

Greenfield-Road
Greenfield-Road

औरंगाबाद - डीएमआयसीच्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक शहरांना जोडण्यासाठी स्वतंत्र ग्रीनफिल्ड रस्त्याच्या उभारणीचा पर्याय निवडण्यात आला आहे. जुन्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा खर्च तब्ब्ल एक हजार कोटींनी अधिक असल्याने सुमारे ९४० कोटींच्या या पर्यायावर बुधवारी (ता. १९) शिक्कामोर्तब झाला.  

औरंगाबादलगत तयार होणाऱ्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक शहरांच्या दळणवळणासाठी स्वतंत्र रस्त्याची घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरात केली होती. बुधवारी नागपुरात झालेल्या आढावा बैठकीत दोन पर्यायांवर चर्चा झाली. विद्यमान रस्त्याच्या विस्तारासाठी लागणारा खर्च हा तब्ब्ल एक हजार ७४० कोटी असल्याने त्यापेक्षा स्वस्त असा ग्रीनफिल्ड रस्त्याच्या उभारणीचा निर्णय यावेळी घेण्यात आला.या कामासाठीचा प्रकल्प अहवाल आणि रेखांकन (अलाइनमेंट) डिसेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्याचे आदेश वरिष्ठांकडून औरंगाबाद प्रकल्प कार्यालयास मिळाले आहेत. विद्यमान रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जमीन महामार्गालगत असल्याने त्याच्या अधिग्रहणासाठी अधिक खर्च अपेक्षित होता, तर नव्याने जमीन घेतली तर हा खर्च कमी झाल्याने ग्रीनफिल्डच्या पर्यायाला हिरवा कंदील मिळाला. 

शेंद्रा-पुणे... शहरात न येता... 
भारतमालाअंतर्गत येणाऱ्या पहिल्या टप्प्यात सुमारे ४५ किलोमीटरच्या रस्त्याची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासह दुसऱ्या टप्प्याच्या अहवाल निर्मितीचे काम केले जाणार आहे. पुढील टप्प्यात याच रस्त्याला पुढे नेत पुणे महामार्गाशी जोडण्यात येईल. त्यामुळे शेंद्रातून निघणारी मोठी वाहने ही बिडकीनमार्गे थेट पुणे रस्त्याला लागतील. तेथून ते जेएनपीटीपर्यंत जाऊ शकतील. दुसऱ्या टप्प्यात बिडकीन- पुणे महामार्ग- कसाबखेडा (४५ किमी) रस्त्याची उभारणी भारतमालाअंतर्गत होणार आहे.

शेंद्रा-बिडकीन-पुणे महामार्ग-कसाबखेडा रस्ता भारतमालाअंतर्गत दोन टप्प्यात होणार आहे. शेंद्रा- बिडकीन हा किमतींतील फरकामुळे ग्रीनफिल्ड होणार आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत या रस्त्याचा प्रकल्प अहवाल आणि रेखांकन पूर्ण करण्यात येणार आहे. 
- अजय गाडेकर, प्रकल्प संचालक, औरंगाबाद एनएचएआय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com