मराठवाड्यात शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

औरंगाबाद - शिवसेनेचे मुंबईसह मराठवाड्यातील 46 आमदार आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी शनिवारी "शिवसंपर्क अभियाना'च्या माध्यमातून मराठवाड्यातील 46 मतदारसंघात शेतकरी, शेतमजूर व जनतेशी थेट संवाद साधला. या सर्वांकडून रविवारी (ता. 7) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अहवाल घेणार असल्याची माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.

सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, पीककर्जाचा आढावा तसेच तूर खरेदीबाबतची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला आमदार व नगरसेवकांचे पथक स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भेट देण्याचे काम शनिवारी दिवसभरात शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून केले गेले. उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष तूर उत्पादक, समृद्धी महामार्ग ग्रस्त शेतकरी, लोकप्रतिनिधी, शिष्टमंडळ यांच्याशी संवाद साधून अहवाल सादर करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

Web Title: shivsena shivcontact campaign in marathwada