बारदाना उपलब्धतेसह तूर खरेदी सुरू करावी - अमरसिंह पंडित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

बीड - जिल्ह्यात यंदा तुरीचे मोठे उत्पादन झाले. बाजारात भाव कमी झाले व नाफेडने हमीभावाने तूर खरेदी सुरू केली. मात्र, बारदाना नसल्याने वारंवार तूर खरेदी बंद होत आहे. शासनाने बारदाना उपलब्ध करून देऊन तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी आमदार अमरसिंह पंडित यांनी गुरुवारी (ता. 30) विधान परिषदेत केली. 

आमदार पंडित यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे तूर खरेदीचा विषय उपस्थित केला. जिल्ह्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मागच्या दहा दिवसांपासून बारदान्याअभावी तूर खरेदी बंद असल्याचे त्यांनी नमूद केले. पाडव्याच्या सणालादेखील शेतकरी खरेदी केंद्रावर मुक्कामी होते. जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रांवर केवळ दोन लाख दहा हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. सध्या एक लाख 13 हजार क्विंटल तूर खरेदी 

केंद्राच्या आवारात खरेदीच्या प्रतीक्षेत असल्याचे अमरसिंह पंडित म्हणाले. शासन मात्र बारदान्याचे कारण सांगून तूर खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहे. वास्तविक शेतकरी स्वत:चा बारदाना देण्यासाठी तयार असताना शासनाला अडचण काय, असा सवालही त्यांनी केला. अवकाळी पावसामुळे खरेदी केंद्राच्या आवारात तुरीचे नुकसान झाले. वाहने दहा-दहा दिवस उभी आहेत. त्यांचा किराया कोण देणार? शासनाकडून तूर खरेदीचे 

नियोजन सपशेल बिघडले असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनातर्फे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी शासन शनिवारपर्यंत याबाबत सभागृहात निवेदन करेल असे आश्‍वासन दिले. यावर सभापतींनी तातडीने तूर खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले. 

Web Title: Should start buying tur amarsingh pandit demand