कर्ज थकल्याच्या बनावाने मोटार केली जप्त; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

श्रीरामपूर - कर्ज थकल्याचा बनाव करून मोटार जप्त केल्याप्रकरणी चोलामंडल कंपनीच्या वित्त व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध आज गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ही मोटार ताब्यात घेतली असून, वाहनतळ चालविणारा अभिजित अशोक ढोले याला अटक केली आहे.

"चोलामंडल'चा वित्त व्यवस्थापक (नाव दिले नाही), वाहन ओढण्याचा ठेका घेतलेला गजानन भांडवलकर (रा. नगर), ऋषिकेश भालदंड, अमोल जाधव, अभिजित ढोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढोलेला अटक करण्यात आली असून, इतर आरोपी बेपत्ता आहेत.

मोटारचालक अशोक दिलीप कथाले (वय 25, रा. सौंदाना, जि. बीड) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे, की श्रीरामपूर बस स्थानकासमोर 29 जुलै रोजी काही जणांनी "चोलामंडल फायनान्स'चे वसुली प्रतिनिधी असल्याचे सांगून मोटार अडविली. कर्ज थकल्याचे सांगून त्यांनी ती ढोले याच्या वाहनतळावर लावली. या प्रकाराची माहिती मी मोटारमालक गणेश काशीद (रा. बीड) यांना दिली. "चोलामंडल'चे कर्जच घेतले नसल्याने त्यांना धक्‍का बसला. त्यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधून तक्रार केली.