सहा हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे फडणवीस, गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रशांत बर्दापूरकर
गुरुवार, 19 एप्रिल 2018

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 13 राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कामांचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले.

अंबाजोगाई (जि. बीड) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 6042 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय आणि राज्य रस्ता कामांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 19) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा पुनरुत्थान, जलसंपदा, नौकायान मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 

अंबाजोगाई परिसरातील वाघाळा येथील अंबा सहकारी साखर कारखाना येथे संगणकाची कळ दाबून उद्घाटन झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार सुनील गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोलहार, आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, संगीता ठोंबरे, लक्ष्मण पवार, आर. टी. देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी 13 राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग कामांचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. दरम्यान, नऊ वर्षानंतर प्रथमच नितीन गडकरी बीड जिल्ह्यात आले.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Six thousand crores road works Bhumi Pujan by Fadnavis and Gadkari