आष्टीत भटक्‍या विमुक्तांचा नंदीबैलांसह मोर्चा

आष्टी - भटक्‍या विमुक्त जाती-जमाती समाजाने सोमवारी तहसील कार्यालयावर नंदीबैलांसह काढलेला मोर्चा.
आष्टी - भटक्‍या विमुक्त जाती-जमाती समाजाने सोमवारी तहसील कार्यालयावर नंदीबैलांसह काढलेला मोर्चा.

आष्टी - धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी डवरी गोसावी या भिक्षेकरी समाजाच्या पाच निरपराध लोकांना मारहाण करून खून करण्यात आल्याच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करून राज्यातील भटके-विमुक्तांना संरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी भटक्‍या विमुक्त जाती-जमाती समाजातर्फे सोमवारी तहसील कार्यालयावर भरपावसात नंदीबैलांसह मोर्चा काढण्यात आला.

राईनपाडा येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या पाच निरपराध लोकांचा क्रूरपणे खून करण्यात आला. असा प्रकार यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील खवा येथेही घडला होता. राईनपाडा घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, राज्यातील भटके-विमुक्तांना संरक्षण द्यावे, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत करून एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, कलागुण दाखवून भटकंती करत पोटाची खळगी भरणाऱ्या या समाजाला प्रशासनातर्फे ओळखपत्र द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com