सोनपेठमध्ये मातेची चिमुकलीसह आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सोनपेठ (जि. परभणी) - कौटुंबिक वादातून थडी पिंपळगाव (ता. सोनपेठ) येथे महिलेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीसह गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. लता नारायण कदम (वय 25) असे तिचे नाव आहे. तिने आपल्या दीड वर्षाच्या राधा या मुलीसह सकाळी सातच्या सुमारास तुडुंब भरलेल्या गोदावरी पात्रात उडी घेतली.

याबाबतची माहिती गावात कळताच तरुणांनी पात्रात उड्या मारून मायलेकींचा शोध घेतला. दोघींचे मृतदेह सापडले असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.