सोयगावला कपाशीवर पाने गुंडाळणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव ; शेतकरी चिंतेत

In Soygaon the Crops situation is bad
In Soygaon the Crops situation is bad

सोयगाव : बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नरपतंगासोबतच कपाशीवर पाने गुंडाळणारी (हिरव्या) अळींचा शुक्रवारपासून मोठा प्रादुर्भाव आढळल्याने सोयगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडले आहे. दरम्यान बोंडअळींचा प्रादुर्भाव उघड होताच त्यापाठोपाठ पुन्हा कपाशीच्या पानांवर पाने गुंडाळणारी (हिरव्या) अळींचा प्रादुर्भाव आढळून आल्याने तालुका कृषी विभागाच्या पथकाकडून शुक्रवारी तातडीने सोयगाव परिसरात पाहणी केली.

सोयगाव तालुक्यात पंधरा दिवसांपासून नरपतंगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने, बोंडअळींच्या प्रादुर्भावाने कपाशीचे पिके बाधित होत असताना या बोंडअळींच्या प्रादुर्भावासोबतच कपाशीवर पाने गुंडाळणाऱ्या (हिरव्या) अळींचा वाढता प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा धडकी भरली आहे. या हिरव्या अळींच्या प्रादुर्भावाने वाढीस लागलेल्या कपाशीवरील हिरवीलचक असलेली पाने गुंडाळून कुरतडण्याचे काम या अळ्याकडून होत असल्याने सोयगाव तालुक्यातील कपाशी पिकांवरील फुले,पात्यासह पानेही खराब होत असल्याने कपाशीचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र आहे. कृषी विभागाच्या बोंडअळींच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण अॅप्सद्वारे निरीक्षणासाठी घेतलेल्या कपाशीच्या क्षेत्रात अचानक नवीन हिरवी अळींचा वाढता प्रादुर्भाव आढळून आल्याने कृषी विभागातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान कृषी विभागाच्या पथकाकडून बोंडअळींच्या नियंत्रणासोबतच हिरवी अळीवर लक्ष दिले जात आहे. 

सोयगाव तालुक्यातील कपाशीच्या झाडांवर कृषी विभागाच्या निरीक्षणाच्या विविध प्रयोगांनी झाडे आणखी कमकुवत होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कीड सर्वेक्षण, सल्ला केंद्र अॅप्सच्या निरीक्षणात सहा गावांच्या ८९१ हेक्टरवरील क्षेत्र बोंडअळींच्या प्रादुर्भावाने बाधित झाल्याचा अहवाल पुण्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संस्थेने दिला असून, मध्येच(पाने खाणाऱ्या) हिरव्या अळींचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या कपाशीला घातक ठरला आहे.

सावळदबारा कृषी मंडळात मोठा प्रादुर्भाव -

सावळदबारा कृषी मंडळात पावसाचा महिनाभराचा खंड आहे. दरम्यान या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही कमी झाल्याने पिकांवर रोगांचा वाढता प्रादुर्भाव आढळून येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सावळदबारा,घानेगाव तांडा,नांदातांडा या भागात हिरव्या अळींचा वाढता प्रादुर्भाव आढळल्याने कृषी विभागाचे कैलास कुमावत यांच्यासह पथकाने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करून यावर उपाययोजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन केले. दरम्यान याभागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कामगंध सापळे बसविल्याने नरपतंगाच्या प्रादुर्भावापासून कपाशी पिके संरक्षित झाल्याची माहिती कैलास कुमावत यांनी दिली.

बोंडअळीसाठी ग्रामसभा व शिवार फेऱ्या

सोयगाव तालुक्यात बोंडअळींच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका कपाशी पिकांना बसला आहे.यासाठी नियंत्रणासाठी वाढता प्रादुर्भाव झालेल्या गावांना कृषी विभागाचे पथक भेटी देऊन शिवार फेऱ्या काढून ग्रामसभाद्वारे विशेष मार्गदर्शन व उपाययोजना करण्याचा नवीन उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com