सोयगाव तालुक्‍यात पाण्याच्या शोधातील बिबट्या पडला विहिरीत

यादवकुमार शिंदे 
शनिवार, 14 एप्रिल 2018

पाण्याच्या शोधात असताना विहिर दिसताच धावत पळत सुटल्याने अंदाज न आल्याने भरदिवसा तीन वर्षीय बिबट्या विहिरीत पडल्याची घटना जरंडी (ता.सोयगाव) शिवारात शनिवारी (ता.14) दुपारच्या सुमारास घडली. 

जरंडी : पाण्याच्या शोधात असताना विहिर दिसताच धावत पळत सुटल्याने अंदाज न आल्याने भरदिवसा तीन वर्षीय बिबट्या विहिरीत पडल्याची घटना जरंडी (ता.सोयगाव) शिवारात शनिवारी (ता.14) दुपारच्या सुमारास घडली. 

या घटनेमुळे जरंडी परिसरात खळबळ उडाली. वनविभागाच्या पथकाने तातडीने जखमी अवस्थेतील बिबट्याला विहिरीबाहेर काढताच तो वनक्षेत्रात पळून गेला. अजिंठ्याच्या डोंगर पायथ्याशी वसलेल्या सोयगाव शिवारातील सर्वच पाणवठे महिनाभरापासून कोरडेठाक झाल्याने अजिंठा डोंगररांगांतील वन्यप्राणी गाव शिवाराकडे पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत.

Web Title: Soygaon Tehsil Leopard in water