एटीएममधील खडखडाटाने क्रीडा साहित्य विक्रीला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017
ऐन सुट्ट्यांत घटली विक्री; पालकांनी फिरवली पाठ
औरंगाबाद - नोटाबंदीनंतर गेल्या कांही महिन्यांपासून एटीएममध्ये असलेल्या खडखडाटामुळे क्रीडा साहित्य विक्रीला ब्रेक लागला आहे. शोधाशोध करूनही एटीएममधून पैसे मिळत नसल्याने पालकांनी क्रीडा साहित्याच्या खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
ऐन सुट्ट्यांत घटली विक्री; पालकांनी फिरवली पाठ
औरंगाबाद - नोटाबंदीनंतर गेल्या कांही महिन्यांपासून एटीएममध्ये असलेल्या खडखडाटामुळे क्रीडा साहित्य विक्रीला ब्रेक लागला आहे. शोधाशोध करूनही एटीएममधून पैसे मिळत नसल्याने पालकांनी क्रीडा साहित्याच्या खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की, खेळाचे साहित्य विकणारी दुकाने सजू लागतात. यंदाही दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी आणले होते. मात्र शहरातील क्रीडा साहित्य विक्रीच्या व्यवहाराला अचानक आठवडाभरापासून ब्रेक लागला आहे. शहरातील एटीएममध्ये असलेला खडखडाट या व्यवसायाला ब्रेक लावण्यास कारणीभूत ठरला आहे. पालक येतात, साहित्यांची पाहणी करतात, काही मुलांच्या तर काही पालकांच्या आवडीने साहित्याची निवड करतात. पण पैसे देताना पालक शहराच्या कानाकोपऱ्यातील एटीएम धुंडाळत आहेत. शेवटी हतबल होऊन साहित्य खरेदीचा बेत बारगळतो. असे चित्र सध्या साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये पाहायला मिळत आहे.

क्रिकेटची लोकप्रियता कायम
औरंगाबाद शहरातील क्रीडाप्रेमी क्रिकेटवर अधिक प्रेम करतात. मुले लहान असो की, मोठी क्रिकेट खेळण्याचा मोह त्यांना अजिबात आवरत नाही. शहरात या खेळाची लोकप्रियता कायम असून, याच खेळाचे सर्वाधिक साहित्य शहरात सध्या विकले जात आहे. लेदर बॉलवर खेळणाऱ्यांची संख्या कमी असली तरी संपूर्ण साहित्य घेऊनच खेळ खेळला जातो आहे. समर कॅम्पच्या निमित्तानेसुद्धा याच खेळाचे साहित्य अधिक प्रमाणात विकले जाते आहे.

बैठे खेळांना पसंती
उन्हाच्या तडाख्यामुळे दिवसभर मुले खेळत नाहीत. उकाड्याचा त्रास टाळण्यासाठी मुलांचा आणि पालकांचा बैठ्या खेळांवर अधिक भर असतो. कॅरम आणि बुद्धिबळासाठीच्या साहित्याची विक्री उन्हाळ्याच्या सुटीच्या निमित्ताने चांगली झाली आहे. पण ऐन सुटीच्या मधोमध एटीएममधील खडखडाट क्रीडासाहित्य विक्री करणाऱ्यांना त्रासदायक ठरतो आहे. याशिवाय बॅडमिंटन, फुटबॉलचे साहित्यसुद्धा मागितले जात आहे.

औरंगाबादेत एटीएममध्ये असलेला खडखडाट त्रासदायक ठरतो आहे. सुरवातीला खेळाच्या साहित्याची चांगली विक्री झाली. पण आता व्यवसाय निम्म्यावर आला आहे. क्रिकेटची जादू कायम आहे आणि अन्य बैठे खेळांना सुद्धा पालक आणि मुले पसंती देत आहेत.
- चेतन जांगडे (क्रीडा साहित्य विक्रेते)

मराठवाडा

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील कुत्री पकडण्याचा विषय थेट दिल्लीपर्यंत गेला असून, केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी याप्रकरणी...

01.39 AM

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद : उर्ध्व भागात सतत जोरदार पाऊस होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीतील पाणीसाठा 88.10 टक्‍यावर...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017