जेरीस आलेले क्रीडा संघटक विभागीय आयुक्तांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

औरंगाबाद : शहरात असलेली राज्य सरकारची क्रीडा प्रबोधिनी आणि विभागीय क्रीडा संकुलातील असुविधेला खेळाडू त्रस्त झाले आहेत. विभागीय संकुल समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भाकर यांनी गुरुवारी (ता. 7) सकाळीच या संकुलाची पाहणी केली. येथील खेळाडुंना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडण्यासाठी शहरातील ऑलिम्पिक संघटनेने विभागीय आयुक्‍तांकडे धाव घेतली आहे.

येथील खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत, मैदाने सुस्थितीत नसल्याने खेळाडू जायबंदी होतात. क्रीडा प्रबोधिनीच्या कामात असलेल्या अनियमिततेवरही यावेळी चर्चा झाली. विभागीय आयुक्तांना पाहणी दरम्यान येथे दारुच्या बाटल्या आढळुन आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विभागीय संकुल समितीच्या मॅरथॉन बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांकडुन आढावा घेतला. ऑलिम्पिक संघटनेच्या चमुत अध्यक्ष पंकज भारसाखळे, गोविंद शर्मा, दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती. संकुल समितीच्या बैठकीत डॉ. उदय डोंगरे, माजी महापौर त्र्यंबक तुपे या अशासकिय सदस्यांची उपस्थिती होती.

Web Title: sports organizer meets divisional commissioner in aurangabad