दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची 15 फेब्रुवारीपासून कलचाचणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

औरंगाबाद - माध्यमिक शालांत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वर्षी ही चाचणी त्या-त्या शाळांमध्ये 15 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत घेण्यात येईल.

विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे, हे जाणून घेण्यासाठी ही चाचणी घेतली जाणार आहे. या कलचाचणीचा अहवाल एप्रिल 2017 मध्ये ऑनलाइन स्वरूपात दिला जाणार आहे. शिवाय माध्यमिक शालांत परीक्षेचा निकालपत्रिकेबरोबर तो छापील स्वरूपातही जाहीर केला जाणार आहे. शाळेत संगणक उपलब्धेप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट तयार करून कलचाचणी वेळेत घेण्याचेही मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

नियमित विद्यार्थ्यांस ही कलचाचणी अनिवार्य आहे. शिवाय कलचाचणीस उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पत्रकातही स्वाक्षऱ्या घेणे अनिवार्य असणार आहे. ही उपस्थिती पत्रके प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांच्या गुणपत्रकाबरोबर विभागीय मंडळात जमा करणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.