उत्पन्नाच्या बाबतीतही एसटी सुसाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पंधरवड्यात तब्बल १ कोटी ४६ लाखांचा फायदा

जालना - लग्नसराईचा एसटी महामंडळालाही लाभ होत आहे. एसटीच्या चालक-वाहक आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांनी कष्ट घेऊन प्रवासी वाढविले. यातून १ मे ते १६ मे या कालावधीमध्ये एसटीला तब्बल १ कोटी ४६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी या दिवसांमध्ये १ कोटी २० लाख ९३ हजारांचे उत्पन्न मिळाले होते.

गावागाव रखडत जाणारी एसटी आता तुफान वेगात धावू लागली. ही किमया एसटी महामंडळाच्या जालना विभागाने करून दाखविली.

विभागनियंत्रक श्री. भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली आगारव्यवस्थापक एस. जे. मेहत्रे यांनी यासाठी अपार कष्ट उपसले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही प्रतिसाद दिला.

गेल्या चार वर्षांपूर्वी सतत जिल्ह्यात अल्पसा पाऊस होत असल्यामुळे उत्पादनात मोठी घट आली. त्यामुळे समाजातील शेतकरी व अन्य घटक आर्थिक संकटाने हैराण झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. काहींच्या लेकीबाळींचे लग्नही थांबले; परंतु गेल्यावर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आणि एकदम चित्रच पालटले. सोयाबीन, तूर, हरभरा आदी शेतमालाचे मोठे उत्पादन झाले. कापसालाही चांगला भाव मिळाला.

दुष्काळामुळे रखडलेला कुटुंबाचा गाडा रुळावर आला. उत्पादन वाढल्याने बाजारही गजबजू लागला. लाखो रुपयांची उलाढाल सुरू झाली. पैका आल्याने रखडलेले विवाह सोहळे पुन्हा सुरू झाले. बदलत्या परिस्थितीचा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. विभागनियंत्रक श्री. भुसारी, श्री. अविनाश पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक मेहत्रे यांनी सतत अधिकारी, कर्मचारी यांच्या बैठका घेऊन नवीन बस व त्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. वाहकचालक यांचे प्रबोधन घडवून आणले आणि यातूनच एसटीच्या उत्पन्नात भर पडली.

नवीन फेऱ्यांतही वाढ
उन्हाळा असल्यामुळे गावी जाणारे आणि लग्नाच्या तिथीनिमित्तही प्रवाशांत वाढ झाली. प्रवाशांना एसटीने प्रवास करता यावा यासाठी जालना बसआगारातून कोल्हापूर, नागपूर, मेहकर, वाशीम, बुलडाणा, बीड चिखली आदी ठिकाणी बसच्या फेऱ्या वाढविल्या. औरंगाबाद -जालना या शहरासाठीही बसेसच्या फेऱ्यांत मोठी वाढ केल्याने प्रवासी संख्येत वाढ झाली. त्यातून एसटीचे उत्पन्नही वाढले.