नाथषष्ठीतून एसटीला सहा लाखांचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पैठण येथे नाथषष्ठीनिमित्त एस.टी. महामंडळातर्फे औरंगाबाद विभागातर्फे चालविण्यात आलेल्या जादा बसगाड्यांतून यंदा सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पन्नात दोन लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती वरिष्ठ आगारप्रमुख स्वप्नील धनाड यांनी दिली.

औरंगाबाद - पैठण येथे नाथषष्ठीनिमित्त एस.टी. महामंडळातर्फे औरंगाबाद विभागातर्फे चालविण्यात आलेल्या जादा बसगाड्यांतून यंदा सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पन्नात दोन लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती वरिष्ठ आगारप्रमुख स्वप्नील धनाड यांनी दिली.

नाथषष्ठीनिमित्त 14 ते 21 मार्चदरम्यान 75 जादा बसगाड्या चालविण्यात आल्या. यात 17 हजार 284 भाविकांनी प्रवास केला. गेल्यावर्षी 53 बसगाड्या चालविण्यात आल्या होत्या. यंदा यात वाढ झाली. हे उत्पन्न मध्यवर्ती बसस्थानकाचे आहे. गेल्यावर्षी तीन लाख 60 हजार रुपयांची कमाई केली होती. यात्रेनिमित्त बस सुविधा पुरविण्याचे नियोजन श्री. धनाड, बस स्वच्छ व वेळेवर पुरविण्याचे काम सह कार्यशाळा अधीक्षक एस. एस. गायकवाड यांनी केले; तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सह वाहतूक अधिकारी के. व्ही. मुंजाळ, सह वाहतूक निरीक्षक ललित शहा, आर. टी. मोटे, दिनेश पाडूळ, चालक-वाहक यांनी पुढाकार घेतला.

Web Title: ST income increased