औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

औरंगाबाद - शहरासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह दुपारी चारच्या सुमारास तब्बल अर्धा तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

औरंगाबाद - शहरासह जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह दुपारी चारच्या सुमारास तब्बल अर्धा तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड तालुक्‍यात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. तसेच वाळूज, लासूर, पिंपळवाडी, वैजापूर, शिऊर, लिंबेजळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह भुरभुर पाऊस झाला. औरंगाबाद शहर व परिसरात अचानक आलेल्या पावसाने चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. शहरातील काही भागांत तर रस्त्यावरून पाणी वाहत होते. उंच सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. उकाड्याने हैराण झालेल्या औरंगाबादकरांना मात्र पावसाच्या सरींमुळे काहीसा दिलासा मिळाला.